c
Now a days the latest trends like artificial intelligence, age computing, machine learning, Quantum computing, internet of things, robotics, 5G technology are rapidly changing the way humans live and work.
Electronics and computer science has been framed to include courses that build a conceptual understanding the basics of electronics as well as computer science.
It emphasizes on Electronics hardware design, Programming techniques, Telecommunication engineering and Software development for IT aspects.
Electronics and Computer Science program nurtures engineers who are proficient in dealing with real-world problems in design, computation, communication and control.
Electronics and Computer Science Engineering is highly demanding domain in industries across the globe.
Modern technology-based applications in smart phones, embedded systems, avionics, space science are few examples where competence in both of fields is required.
Additionally Advance Courses have been added such as: -
Artificial Intelligence and Machine Learning, Data Science, Mobile Communication, VLSI, IOT, etc.
A practical-oriented approach is being followed to make students proficient in the competitive Industry Environment.
Jobs or Scope after completing Graduation (B.E.) in Electronics & Computer Science:
System control engineer, Software developer, Electronic Design Engineer, System Analyst, Software engineer, Test Engineer, Power Engineer etc.
इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर सायन्स विषयी
चौथ्या औद्योगिक क्रांतीने आपण नवनवीन तंत्रज्ञानाशी अवगत झालो आहोत जसे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, व्हर्च्युअल रिअॅलिटी, इंटरनेट ऑफ थिंग्स, रोबोटिक्स, 5G इत्यादी.
नवीन तंत्रज्ञानाची औद्योगिक व्यवसायातील आवश्यकता लक्षात घेऊन इंजिनिअरींगमधील इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर सायन्स या नवीन शाखेचा अभ्यासक्रम ठरविण्यात आलेला आहे. या शाखेमधून विद्यार्थ्यांना बेसिक तसेच अॅडव्हान्स कोर्सेसचा अभ्यास करता येणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर सायन्स ही इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन तसेच कॉम्प्युटर सायन्स या शाखांची एकात्मिक आणि मिश्रित शाखा बनविण्यात आलेली आहे.
एम्बेडेड सिस्टीम, स्पेस सायन्स अशा क्षेत्रांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स तसेच कॉम्प्युटर सायन्स या दोन्हीचे ज्ञान आवश्यक आहे. डेटा सायन्स, वेब डिझाईनिंग, सायबर सिक्युरिटी, मशीन लर्निंग तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स या कॉम्प्युटर सायन्सच्याच उपशाखा आहेत. भविष्यात अनेक ठिकाणी याच तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने या क्षेत्रातील पदवीधरांची मागणी वाढणार आहे. मानव व रोबो यांच्यातील दुवा साधण्याचे महत्वाचे काम इंजिनीअर्सना करावे लागणार आहे. मानवी विचार, वर्तणुक, भावभावना यांचा यंत्रांशी मेळ घालावा लागणार आहे. सॅटेलाइट कम्युनिकेशन, टेलिकम्युनिकेशन, रिसर्च, डेव्हलपमेंट, इन्फोर्मेशन यासारख्या क्षेत्रांमध्येही इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळू शकते.
इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर सायन्स या शाखेमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर टेस्टिंग इंजिनिअर, सॉफ्टवेअर डेव्हेलपर, सिस्टीम अॅनालीस्ट, सिस्टीम कंट्रोल इंजिनिअर, टेलिकम्युनिकेशन इंजिनियर, एम्बेडेड सिस्टीम डिझायनर अशा नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
या शाखेच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना साठ टक्के इलेक्ट्रॉनिक्सचे विषय आणि चाळीस टक्के कॉम्प्युटर सायन्स किंवा साठ टक्के कॉम्प्युटर सायन्स आणि चाळीस टक्के इलेक्ट्रॉनिक्सचे विषय निवडू शकता येतील. ज्या विद्यार्थ्यांना आय. टी. क्षेत्रामध्ये आवड आहे त्यांनाही हि शाखा एक उत्तम पर्याय आहे.
त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स तसेच कॉम्प्युटर सायन्स व उपशाखांमध्ये आवड असणाऱ्यांसाठी, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर सायन्स या नवीन शाखेचा प्रवेश घेण्यासाठी विचार करू शकता.